Khopoli Mangesh Kalokhe killing Case saam tv
मुंबई/पुणे

Khopoli Murder Case : शिंदेसेनेच्या नेत्याची खोपोलीत निर्घृण हत्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षासह १० जणांवर गुन्हा

Shinde Sena leader Mangesh Kalokhe murder in Khopoli : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिंदेसेनेचे नेते मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Khopoli murder case : रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. नगरपरिषदेच्या निवडणुकीत काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण शुक्रवार या आनंदाला नजर लागली. मंगेश काळोखे यांची काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. तलवार, विळा आणि कुऱ्हाडीने वार करून मंगेश यांचा जीव घेतला. या घटनेनंतर खोपोलीत एकच खळबळ उडाली. संतप्त खोपोलीकरांनी रस्तारोको करत आपला निषेध व्यक्त केला. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. ही हत्या राजकीय हेतूने झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

खोपोलीमधील नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती मंगेश हे शुक्रवारी सकाळी सात वाजता मुलांना शाळेत सोडून घरी परत येत होते. दुचाकीवरून ते घराकडे येत असताना एका काळ्या कारमधून काही अज्ञात लोक आले अन् त्यांना घेरले. तलवार, विळा आणि कुऱ्हाडीने मंगेश यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मंगेश यांचा जागेवरच मृत्यू झाला. मंगेश हे खोपोलीचे माजी नगरसेवक राहिलेत. ते शिंदेंच्या शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते, नेते होते. त्यांच्या हत्येनंतर खोपोलीत संतापाची लाट उसळली, जमाव रस्त्यावर उतरला होता.

मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. मंगेश काळोखे यांच्या चुलत भावाने हत्येचा कट रचल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. खोपोली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर आणि त्यांची मुले दर्शन आणि धनेश आणि सचिन चव्हाण यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास खोपोली पोलिसांकडून करण्यात येत आहे.

शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी काळोखे यांच्या हत्येचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलाय. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळेच राजकीय सूडबुद्धीतून ही हत्या झाली असावी. रवींद्र यांच्या पत्नी उर्मिला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वॉर्ड क्रमांक ३ मधून शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या ७०० हून अधिक मतांनी पराभूत झाल्या होत्या. घारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे जवळचे सहकारी आहेत. घारे यांनी २०२४ मध्ये कर्जतमधून शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा ५,६९४ मतांनी पराभव झाला होता. मंगेश हे आमदार थोरवे यांचे कट्टर समर्थक होते.

खोपोलीतील घटनेत माझा हात नाही- घारे

खोलीतील हत्या प्रकरणात माझा कोणताच हात नसून माझ्यावर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून बुजून आरोप केले आहेत. असा आरोप हत्या प्रकरणात नाव आलेले सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्यावर केलेत. मला सुद्धा या घटनेचं वाईट वाटत आहे. मला या गोष्टीचे दुःख आहे. माझं नाव आणि आमच्यावर दबाव टाकण्यासाठी आमदार थोरवे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचाही आरोप त्यांनी केला. मी सर्वांसमोर येऊन याचा खुलासा करणार असल्याच घारे म्हणालेत. या प्रसंगात मी काळोखे कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Health Care : दुधाशिवाय भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते? जाणून घ्या

Baramati Places: पुण्यापासून हाकेच्या अंतरावर बारामतीतील या 5 प्रसिद्ध ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT