Eknath Shinde Mla Meeting Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: विधानसभेसाठी शिंदे यांचा शरद पवार फॉर्म्युला? वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय ठरलं? वाचा...

Shiv Sena Shinde Group Politics: आज वर्ष बंगल्यावर शिंदे गटाची बैठक पार पडली. याच बैठकी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने शरद पवार गटाचा फॉर्म्युला उपयोगात आणण्याचं ठरवलं आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने शरद पवार गटाचा फॉर्म्युला उपयोगात आणण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लिमिटेड जागांवरतीच लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्लॅन आहे. विधानसभेसाठी 100 जागांची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

आज वर्ष बंगल्यावर शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते उपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातील घडामोडींचा अंदाज घेण्यात आला. पक्षाची आगामी रणनीतीही या बैठकीत ठरवण्यात आली. याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सगळ्याच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक होती. या बैठकीत 100 जागांवर लक्ष केंद्रित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

महाविकास आघडीत शरद पवार गटाने लोकसबाह निवणुकीत फक्त 10 जागांवर निवडणूक लढवली होती. या 10 जागांवर शरद पवार यांनी 100 टक्के लक्ष केंद्रित केलं होतं. यातच लोकसभेला केवळ दहा जागा घेऊन आठ जागा शरद पवार यांनी जिंकल्या होत्या. त्याचप्रमाणे लिमिटेड जागांवर लढून त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न.

सूत्रांनी सांगितलं की, शिंदे यांनी कोणत्या 100 जागांवर निवडणूक लढवायची आहे, याची आधीच निवड केली आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना या जागांवर काम करण्यास सुरुवात करण्याचे निर्देशही दिले आहेत. या जागांसाठी निरीक्षकही नेमले आहेत. त्याचप्रमाणे महिला आघाडी संदर्भात पद भरण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection : 'अवतार'च्या रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ची हवा, रणवीरच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?

Kitchen Hacks : फक्त १५ दिवसांत घरच्या घरी उगवा ताजी कोथिंबीर, फॉलो करा या भन्नाट टिप्स

Silk Saree Blouse Designs: सिल्क साडीवर शोभून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, डेली वेअरसाठी नक्की ट्राय करा

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT