70 लाख किंमतीच्या मुद्देमालाचा ट्रक शीळ-डायघर पोलिसांनी पकडला प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

70 लाख किंमतीच्या मुद्देमालाचा ट्रक शीळ-डायघर पोलिसांनी पकडला

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधील शीळ-डायघर पोलिसांनी एक मोठ्या चोरीचा ट्रक पकडला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली :  कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधील शीळ-डायघर पोलिसांनी एक मोठा चोरीचा ट्रक पकडला आहे. ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस व अंमलदार हे गुरुवारी रात्री पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक कापडणीस यांना गुप्त बातमीदारामार्फत एक चोरीचा ट्रक पोलिस ठाणे हद्दीत येणार असल्याची बातमी मिळाली. (Shil-Daighar police in Kalyan have seized a large stolen truck)

हे देखील पहा -

या बातमीच्या अनुषंगाने सपोनि कापडणीस व तपास पथकातील अमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील हायवे तसेच निर्जनस्थळी शोध घेतला. तेव्हा १४ गावातील खोत बंगला, मोकाशी पाडा, पनवेल- मुंब्रा रोडवर एक ट्रक उभा असल्याचे दिसले. सदर ट्रक पकडत असताना ट्रक चालक अंधाराचा फायदा घेऊन पळाला. पोलिसांनी पाठलाग करून ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता ट्रक मध्ये 21 टन वजनाचे ॲल्युमिनियम प्लेट मिळून आल्या. या ट्रक मधून एकूण 70 लाख किंमतीचा मुद्देमाल आता जप्त करण्यात आला आहे. 

सदर ट्रक क्रमांक CG 04,LP 5601 असा असल्याने ट्रक मालकाशी संपर्क केला असता सदरचा ट्रक हा सुपे पारनेर एमआयडीसी येथून जमशेदपूर येथे जात असताना दिनांक 10 ऑगस्टला पुणे नाशिक हायवेवर संगमनेर येथे 6 अज्ञात इसमांनी लुटला असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या ट्रकमधून एकूण 70 लाख किंमतीचा मुद्देमाल आता जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 350/2021 भादवि कलम 395 अन्वये गुन्हे चोरट्यावर दाखल केले आहेत अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली. सदरची कामगिरी तपास पथकातील सपोनि कापडणीस, पोलीस हवालदार मोहिते, भामरे, पोलीस नाईक सत्रे, सुशांत पाटील, बोराडे, पोलीस शिपाई बरफ, सोनवणे यांनी केलेली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

SCROLL FOR NEXT