Crime: चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीनेच केली पतीची हत्या!
Crime: चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीनेच केली पतीची हत्या!Saam Tv

Crime: चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीनेच केली पतीची हत्या!

नागपूर मध्ये हत्येचा एक भयानक प्रकार घडला आहे. पतीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्याने पत्नीने कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना काटोलमध्ये बुधवारी रात्री 10 वाजाताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
Published on

संजय डाफ

नागपूर: नागपूरमध्ये Nagpur हत्येचा एक भयानक प्रकार घडला आहे. पतीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्याने पत्नीने कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना काटोलमध्ये बुधवारी रात्री 10 वाजाताच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी Police खूनाचा गुन्हा दाखल करून मारेकरीच्या पत्नीला अटक केली आहे. सुकलसिंग माखनसिंग सकाेम (वय 49) असे मृताचे नांव आहे. तर फुलवंतीबाई सकोम (वय 44) असे अटकेतील मारेकरी पत्नीचे नाव आहे.

हे देखील पहा-

वादातून मारहाण;

सुकलसिंग हे शेतात काम करायचे आणि ते फुलवंतीबाईसोबतच शेतातील घरात राहात असे. सुकलसिंग हे फुलवंतीबाई यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असत. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. बुधवारीही दोघांमध्ये वाद झाला. त्यातून सुकलसिंग यांनी फुलवंतीबाईला बेदम मारहाण केली.

यानंतर फुलवंतीबाईने कु्ऱ्हाडीने सुकलसिंग यांच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले. या वारामुळे जखमी झाल्याने सुकलसिंग यांचा मृत्यू झाला आहे. तर सुकलसिंग यांनी स्वत:वर कुऱ्हाडीने वार करून स्वतःच आत्महत्या केल्याचा बनाव फुलवंतीबाईने पोलिसांसमोर केला. मात्र तिचा खोटारडेपणा नंतर समोर आला.

Crime: चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीनेच केली पतीची हत्या!
पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक; 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला आणि पंचनामा करून पोलिसांनी सुकलसिंग यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे पाठवला. पोलिसांनी फुलवंतीबाईची कसून चौकशी केली. चारित्र्यावर संशय घेत असल्याने सुकलसिंग यांची हत्या केल्याची कबुली तिने शेवटी पोलिसांकडे दिली. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर केले असता तिची 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com