junnar, nagar kalyan highway, onion saam tv
मुंबई/पुणे

Rasta Roko Andolan : कांदा प्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; नगर - कल्याण महामार्गावर छेडलं रास्ता राेकाे आंदाेलन

या आंदाेलनामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली हाेती.

रोहिदास गाडगे

जुन्नर : नगर - कल्याण महामार्गावर ओतुर येथे जुन्नर तालुका शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा प्रश्नी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनामुळं महामार्गावरील वाहतुक (traffic) काही काळ विस्कळीत झाली हाेती.

कांद्यावरील निर्यात बंदी कायमची उठवावी, सी रंगराजन समितीनुसार बाजारभाव मिळावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खराब झालेल्या कांद्याची नुकसान भरपाई प्रति किलो तीस रुपये बाजारभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीक कर्जाच्या व्याजासह भरणा केलेल्या व्याजाचा परतावा मिळावा या मागण्यांसाठी हे आंदाेलन छेडण्यात आलं हाेते.

यावेळी आंदाेलकांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला सडक्या कांद्याचा हार घातला. या आंदाेलनामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

shetkari sanghatna rasta roko aandolan

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: आशियातील सर्वात मोठे गाव भारतात कोणत्या भागात आहे?

Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई, एकाच पदासाठी दोघांकडून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती

Amruta Khanvilkar : अमृताने पटकावला पहिला राज्य चित्रपट पुरस्कार,'चंद्रमुखी'चं सर्वत्र होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT