Shashikant Shinde News Saam tv
मुंबई/पुणे

Shashikant Shinde : मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, VIDEO

Shashikant Shinde News : शरद पवारांनी अखेर भाकर फिरवली. आता शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शशिंकात शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, आज शरद पवारांनी भाकरी फिरवली. त्यानंतर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांनी पदाचा अखेर राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची महाराष्ट्राची धुरा ही साताऱ्यातील नेत्याकडे सोपवलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विशेषत: सातारा जिल्हा शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपद देऊन मोठी राजकीय खेळी खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबई बाजार समितीचं सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना छगन भुजबळांनी राष्ट्रवादीत आणलं. माथाडी कामागारांमध्ये शशिकांत शिंदे यांच्या नावाची मोठी क्रेझ आहे. शरद पवारांनी त्यांना साताऱ्यात आणलं. त्यानंतर त्यांना जावळीतून राष्ट्रवादीचं तिकीट दिलं होतं. पुढे शालिनी पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानंतर कोरेगावात आणलं. त्यांची शरद पवारांवरील निष्ठा महत्वाची ठरली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकारणाचा गाभा मानला जातो. याच भागातून राष्ट्रवादीला बळ मिळत गेले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या भागातील लोकांशी शशिकांत शिंदे यांचे चांगलं नातं आहे. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला सिद्ध करण्याचं मोठं आव्हान शशिकांत शिंदे यांच्यापुढे असणार आहे.

शशिकांत शिंदे यांच्या कारकिर्दीवर नजर टाकूया

शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून 3 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. 1999 , 2009 आणि 2014 साली शशिकांत शिंदे विधानसभेवर निवडून आले होते. 2009 मध्ये विधामंडळाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड झाली. 2020 साली विधानपरिषदेत बिनविरोध निवड झाली. त्यानंतर 2025 मध्ये त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रभारी पदावर निवड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT