Sharmila Thackeray-Aditya Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Sharmila Thackeray: 'आदित्य ठाकरे माझा पुतण्या, म्हणून...'; दिशा सालियन प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

Sharmila raj Thackeray on Uddhav balasaheb thackeray: आज सोमवारी पुन्हा एकदा, आदित्य ठाकरे माझा पुतण्या आहे, म्हणून पाठराखण करत आहे, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Sharmila Thackeray Latest News:

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंचं नाव घेण्यात आलं होतं. त्यामुळे एसआयटीची स्थापना झाल्याने आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय. याचदरम्यान, दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यानंतर आज सोमवारी पुन्हा एकदा, आदित्य ठाकरे माझा पुतण्या आहे, म्हणून पाठराखण करत आहे, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मनसेच्या शिवडी विधानसभा क्षेत्रातील शाखेच्या वर्धानदिनानिमित्त सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शर्मिला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आज सोमवारी नागपुरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची पाठराखण केल्याने शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले.

मी पुतण्यावर विश्वास दाखवला : शर्मिला ठाकरे

यावर भाष्य करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'त्यांनी आभार मानायची संधी केव्हाच दिली नाही. केणी प्रकरणावरून त्यांनी आम्हाला चिमटे मारले, त्यावरून पण बोलायची संधी सोडली नाही. मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला आहे. आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत'.

धारावी प्रकल्पावर शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?

धारावी प्रकल्पावर भाष्य करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं. धारावीच पुनर्विकास करायचा होता, मग तुम्ही का केला नाही? धारावी प्रकल्पाबद्दल साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आहे'.

तसेच शर्मिला ठाकरे यांनी यावेळी आरक्षणावरही भाष्य केलं. ' सर्व विरोधी पक्ष नेते म्हणत आहे, की आरक्षण दया. पण त्यांनी तेव्हा का दिलं नाही. तुम्हाला कोणी थांबवलं होतं? शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होतात', असे त्या म्हणाल्या.

बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. यावर बोलतना माजी आमदार बाळा नांदगावकर म्हणाले, ' आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. वहिनीपेक्षा आमच्या भावना वेगळ्या नाहीत. याबद्दल त्यांनी विचार करावा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड

Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Board Exam : दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ! शाळा अन् महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत, पालकांची नाराजी

डोक्यावर हेल्मेट नाही, हँडलवर हात न ठेवता तरुणीने सुसाट बाईक पळवली, धोकादायक स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT