Raj Thackeray News : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींकडेच का? दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत का?, राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray on Adani : इतर मोठ्या कंपन्या नाहीत का? १० महिन्यांपूर्वीच धारावीचा प्रकल्प अदानींकडे गेला मग महाविकास आघाडीला आत्ताच अदानींना विरोध करावासा का वाटला? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Raj Thackeray - Gautam Adani
Raj Thackeray - Gautam AdaniSaam TV
Published On

Mumbai News :

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. अदानी ग्रुपला धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाची जबाबदारी दिल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार, भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हा प्रकल्प अदानींनाच कसा मिळाला? याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

अदानींकडे असं काय आहे की विमानतळापासून ते झोपडपट्टी पुनर्वसनापर्यंतचे सर्व प्रकल्प त्यांनाच मिळतात. भारतात दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

तसेच १० महिन्यांपूर्वीच धारावीचा प्रकल्प अदानींकडे गेल्याचं घोषित झालं होतं. मग महाविकास आघाडीला आता अदानींना विरोध करावासा का वाटला? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

Raj Thackeray - Gautam Adani
Maharashtra Political News : सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

धारावी छ पुनर्विकास सारखा मोठा प्रकल्प मुंबईत येत आहे. मात्र तो परस्पर अदानींना का दिला? इथून सुरुवात होते. अदानींकडे असं काय आहे की विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, इतर गोष्टीही तेच हाताळू शकतात. सगळं अदानींनाच का? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एवढ्या मोठ्या प्रकल्पाला बाकी कंपन्यांचे टेंडर्स देखील मागवायला पाहिजे होते. धारावीमध्ये काय विकासकामं होणार आहेत, हे सगळ्यांना कळायला पाहिजे होतं. पण ते झालं नाही. मला प्रश्न एवढात आहे की, सगळ्यांना आज का जाग आली आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com