Sharad Pawar to visit Dagdusheth Ganpati in Pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune : शरद पवार घेणार 'दगडूशेठ'चं दर्शन; ब्राम्हण संघटनांसोबतच्या बैठकीनंतर व्यक्त केली इच्छा

Sharad Pawar to visit Dagdusheth Ganpati : दुपारी साधारणतः ३ वाजता पवार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह गणपतीचे दर्शन घेतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे: ब्राम्हण संघटनांसोबच बैठक घेतल्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sahrad Pawar) पवार आज मंदिरात दर्शनाला जाणार आहेत. पुण्यातल्या (Pune) सुप्रसिद्ध अशा दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात (dagdusheth halwai ganpati temple) दर्शन घेण्यासाठी पवार येथे जाणार आहेत. दुपारी साधारणतः ३ वाजता पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह गणपतीचे दर्शन घेतील. (Sharad Pawar to visit Dagdusheth Ganpati; Decision after meeting with Brahmin organizations)

हे देखील पाहा -

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पवारांवर जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. तसंच ते नास्तिक आहेत असंही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर थोड्याच दिवासंमध्ये पवारांनी ब्राम्हण संघटनांसोबत बैठक घेतली. ही बैठक ब्राम्हण संघटनांकडून आलेल्या विनंतीवरुन घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्या पाठोपाठ आज पवार देवदर्शनालाही जाणार आहेत.

पवारांच्या भेटीत ब्राम्हण संघटना समाधानी

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांकडून पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात २१ मे ला संध्याकाळी पाच वाजता ब्राम्हण संघटानांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी २० ते २२ संघटनांना पवारांनी (Sharad Pawar) निमंत्रण दिलं होतं. या चर्चेला २० ब्राम्हण संघटानांच्या ६० ब्राम्हण पदाधिकाऱ्यांशी पवारांशी चर्चा झाली. पवारांशी बोलून समाधानी असून आमच्या शंकांचं निरसन झालं आहे अशी भावना ब्राम्हण समाजाच्या प्रतिनिधींनी दिली होती.

दुषित वातावरण निवळण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

एकीकडे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे वातावरण दुषित झाले. ते दुषित वातावरण निवळण्याचा पुण्यातील या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न झाला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कविता भरसभेत वाचून दाखवली होती. त्यानंतर शरद पवारांवर भाजपसहित अनेक ब्राह्मण संघटनांनी टीका केली होती. आमदार अमोल मिटकरी यांनीही काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजविरोधी विधान केलं होतं. या साऱ्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं होतं. सोशल मीडियावरही त्या कवितेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार टीकेचे धनी ठरले होते. ते सारे दूषित वातावरण निवळण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला. या बैठकीनंतर आता पवार हे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT