Sharad Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Video : ...अन् मला पत्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली; बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आलं होतं. छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं. मात्र, या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी पत्रकारितेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही काम केल्याचा खुलासा केला.

पुण्यातील पत्रकार भवनातील पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पत्रकारितेवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'मला माहीत नव्हतं की, माझी ओळख जादूगार म्हणून करुन दिली जाईल. पत्रकार आणि व्यवहार याचा संबध फार मर्यादित आहे. पत्रकार संघासाठी आम्ही जागा दिली. पण जागा जास्त असल्याचे सांगत, त्यातील काही जागा परत केली'.

'सकाळमध्ये जाहिरात आली होती. ती जाहिरात पाहून पत्रकार पदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी माझी मुलाखत नानासाहेब परुळेकर यांनी घेतली होती. त्यावेळी मला पत्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आम्ही एक पेपर सुरु केला होता. त्याचे नाव 'नेता' असे होते. त्याचे एक-दोन अंक निघाले, असा किस्सा शरद पवारांनी सांगितला.

'बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा एक वृत्तपत्र काढले. 'राजनिती' त्याचे नाव होते. त्यासाठी आम्ही सहकाऱ्यांनी पाच-पाच हजार रुपये जमा केले होते. सिद्धी विनायकाच्या चरणी त्याचा पहिला अंक वाहिला. तो अंक पुन्हा काही दिसला नाही, असेही त्यांनी सांगितले.

'सामना पेपर हल्ली वाचायला लागलो आहे. आमच्यावर गांभिर्याने पत्रकारिता करणाऱ्यांचा परिणाम होतो. वाचकांवर देखील परिणाम होतो. हल्लीच्या काळात मीडिया आमच्या क्षेत्रात जास्त प्रभावी आहे. वृत्तपत्र आणि मीडियाच्या मागे अदृश्य शक्ती आहे, असे आता जाणवते आहे. तुमच्या काही लोकांशी बोलताना जाणवते, असे पवार पुढे म्हणाले.

'माझं निवासस्थान दोन एकरात आहे. दिल्लीमधील सरकारी निवासस्थान. अशी चार घरे एकत्र करून पंतप्रधानांचे निवास्थान आहे. त्यातील एका भागात रोजच्या वर्तमानात पत्रात काय छापून आले आहे, त्याचा अभ्यास केला जातो. वृत्तपत्रांच्या मालकांना तिथून चांगले वाईट सांगितले जाते. अशी व्यवस्था आधी नव्हती, आता अशी व्यवस्था पाहायला मिळत आहे, असेही शरद पवारांनी पुढे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT