Sharad Pawar reaction on Sunetra Pawar deputy CM oath Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, शरद पवारांना माहितीच नाही, वाचा नेमकं काय म्हणाले....

Sharad Pawar reaction on Sunetra Pawar deputy CM oath : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत कोणतीही माहिती किंवा चर्चा आमच्याकडे झालेली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया दिली.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar latest statement : सुनेत्रा पवार यांच्या आजच्या शपथविधीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे शरद पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा झालेली नाही. सुनेत्रा पवारांबाबत त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे नेते, तो काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षानं काय करावं, हे त्यांनी ठरवावं, असे शरद पवार म्हणाले. (Sunetra Pawar deputy CM news )

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत कुठली ही चर्चा आमच्याकडे झाली नाही. ही मुंबईत चर्चा झाली असावी. पटेल, तटकरे यांना अधिकार आहेत त्यांनी काही ठरवलं असेल. पण आमच्याकडे कुठे ही काही चर्चा नाही त्यावर मी बोलणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या कुठल्या ही चर्चेत मी नव्हतो. अजित दादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे या चर्चेतमध्ये सातत्याने होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही चर्चा ४ महिने सुरू होती, याचं नेतृत्व अजित दादा आणि जयंत पाटील यांच्यावर होती. पण अपघात झाला आणि यात खंड पडला आहे. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं, हा निर्णय १२ तारखेला जाहीर करायचं ही तारीख अजित दादा यांनी दिली होती, असे शरद पवार म्हणाले. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती पण अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी, अशी सुद्धा आमची इच्छा आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार भावुक -

प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही योगदान असतं. अजित पवार अनेक वर्षे संघटनेचे आणि सामान्य लोकांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्वान नेता होता. लोकांच्या प्रश्नावर माहिती घ्यायची आणि त्यांना न्याय देण्याचं काम करणं हे त्याचं वैशिष्ट्य होतं. अजितची कामाची सुरुवात सकाळीच होत असते, आज हयात असते तर ते घरी नसते, असे शरद पवार म्हणाले. कामामध्ये त्याने कधीही अजित ने कमतरता दाखवली नाही. कर्तृत्व व्यक्ती सोडून जाणे ही आघात आहे, हा सगळ्यांवर झाला आहे. या परिस्थितीला समोरं जावं लागेल. लोकांचं दुःख कमी करण्यासाठी आम्हाला लोकांची कामं करावे लागतील. नव्या पिढीची जबाबदारी जास्त आहे, असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : दररोज पुदिन्याचा चहा पिण्याचे फायदे, जाणून घ्या

Panchang Today: शनिवारचा योग फलदायी! माघ शुक्ल चतुर्दशीचं पंचांग, शुभ मुहूर्त आणि राशीफल

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार; पार्थ पवार खासदार होणार?

Mahashivratri 2026 Date: महाशिवरात्रीचा उपवास कोणत्या दिवशी धरावा? पाहा तिथी आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT