PM Narendra Modi And Sharad Pawar SAAM TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: PM मोदींकडून राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप; शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar News: पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीवर तब्बल ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Sharad Pawar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीवर तब्बल ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीवर केलेल्या गंभीर आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

शरद पवार म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो उल्लेख केला, ते शिखर बँक प्रकरण कोर्टात गेले आहे. माझा त्या शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही, अशा संस्थेसोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे'.

'देशात मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात. देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात. मात्र ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असेही पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला, मी कधी शिखर बँकेचा सदस्य नव्हतो. मी कधी कर्ज घेतले नव्हते'.

'मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. याबाबत बोलणे कितपत ठिक आहे? पाटबंधारे खात्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं, मात्र ते काही खरे नाही, असेही पवार पुढे म्हणाले.

दरम्यान, भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय समिती पक्षात प्रवेश केला आहे. भालके यांच्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली, त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती. त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही'.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर भेटीवर भाष्य करताना पवार म्हणाले, 'शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री येथे आले, त्यांच्या विठ्ठल दर्शनावर हरकत घ्यायचं काही कारण नाही. परंतु दर्शनाव्यतिरिक्त जे काही जबरदस्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न शेकडो गाड्या आणि बाकीच्या इतर गोष्टी हे चिंताग्रस्त, वादग्रस्त आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - भगीरथ भालके यांच्यावर गुन्हा दाखल

Supermoon Date And Time: चंद्र येणार पृथ्वीच्या अगदी जवळ... सुपरमून दिसणार, कधी आणि किती वाजता? जाणून घ्या

Hindu Wedding Ritual: लग्नामध्ये नवरी वराच्या डाव्या बाजूला का बसते? कारण काय?

शीतल तेजवानीच्या मुसक्या आवळल्या, गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्या मास्टरमाईंडचे काळे कारनामे समोर

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभूच्या लग्नातले अनसीन फोटो व्हायरल, पाहा सुंदर PHOTO

SCROLL FOR NEXT