Sonia Duhan NCP News Saam TV
मुंबई/पुणे

Sonia Duhan News : सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश करणार? शरद पवारांच्या पक्षाला धक्का बसण्याची शक्यता

Sonia Duhan NCP Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Satish Daud

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी नुकतेच पाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. मात्र, या निकालाआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय युवती आघाडीच्या अध्यक्ष सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

शर्मा यांनी ट्विटवर पोस्ट करुन आपल्या राजीनाम्याची माहिती दिली होती. युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या धीरज शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात धीरज शर्मा यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. धीरज शर्मा यांच्यानंतर आता सोनिया दुहान या देखील अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत सोनिया दुहान यांच्याकडून कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही.

विशेष बाब म्हणजे, काही तासांपूर्वी सोनिया दुहान यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती आपल्या पोस्टमधून दुहान यांनी 'इंडिया' आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. साम टीव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया दुहान दोन दिवसांत अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत सोनिया दुहान?

सोनिया दुहान राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत सक्रिय कामास सुरूवात केली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला. तेव्हा, हॉटेलमध्ये थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना परत आणण्याचे काम सोनिया दुहान यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT