कंत्राटी भरतीच्या निर्णयाच्या मुद्द्यावरुन राज्यातलं वातावरण तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीच्या निर्णयाचं खापर ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर फोडलं.
राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांनी माफी मागावी. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. या मागणीचा शरद पवार यांनी शेलक्या भाषेत समाचार घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पत्राकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, हे जे गृहस्थ आहेत, ज्यांचं तुम्ही नाव घेतलं ते आता त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र मागच्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीवेळी पक्षाने त्यांना तिकीटही नाकारलं होतं. ज्यांना पक्षाने तिकीट देण्यासही लायक समजलं नाही, त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं, असा टोला शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. (Political News)
राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सुसंवाद झाल्याचं दिसतंय. सरकार यामध्ये काय करतंय याकडे आमचंही लक्ष आहे. दोन दिवसांत सरकारची भूमिका स्पष्ट होईल. यातून काही मार्ग निघाला तर चांगलं आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. त्यांच्या मागण्यांमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसोबतच्या बैठकीबाबतही शरद पवार यांनी माहिती दिली. इंडिया आघाडीत जे लोक सहभागी होतील याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांसोबतची कालची भेट त्यासाठी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या एका ग्रंथाला १०० पूर्ण झाली आहेत. यासंबंधीच्या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलो होतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.