Sachin ahir news  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाणार नाही; बड्या नेत्याचा दावा

Maharashtra Political News : शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाणार नसल्याचा दावा सचिन अहिर यांनी केला आहे.

गोपाल मोटघरे

सचिन अहिर शरद पवार गटावर केलं मोठं भाष्य

शरद पवार गट अजित पवारांसोबत जाणार नसल्याचा सचिन अहिर यांचा दावा

सचिन अहिर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

एक महत्वाची आणि मोठी बातमी पुण्यातून समोर येतेय. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असा स्पष्ट दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन आहेर म्हणाले की, याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

आज रात्री उशिरा खासदार अमोल कोल्हे यांच्याशीही चर्चा होणार आहे. दरम्यान, सत्तेत असलेल्या पक्षांची दुर्दैवी अवस्था भाजपने निर्माण केली असल्याचा आरोप करत, भाजप आमदारांमध्ये अति आत्मविश्वास असल्याचे सचिन आहेर यांनी सांगितले. याचवेळी,खासदार श्रीरंग बारणे यांचा भाजपने अपमान केल्याचा आरोप करत, शिंदे गटाने उलट स्वबळावर निवडणूक लढवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत कोणतेही अधिकृत बोलणे झालेले नाही. त्यामुळे त्या विषयावर बोलणे योग्य नसल्याचेही सचिन आहेर यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावर सचिन अहिर काय म्हणाले?

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशावर सचिन अहिर म्हणाले, 'आम्हाला आनंद आहे ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबत आहेत. आमच्या विचारधारेसोबत ते राहिले हा आनंद आहे. ते राष्ट्रवादीत राहिले असते तर जास्त आनंद असता. पुण्यात राष्ट्रवादी महायुतीत जातो की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. मनसे आणि महाविकास आघाडी असा विचार सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT