Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदेंच्या झेड सुरक्षेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

आमदार सुहास कांदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झेड सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: शिवसेनेचे (ShivSena) बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झेड सिक्युरीटीचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी मारण्याची धमकी येऊनही त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती, असा कांदे यांनी केला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, मला वस्तुस्थिती माहित नाही. पण शासनात अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहिती आहे की सुरक्षा पुरवणे याचा निर्णय घेणारे कॅबीनेट असत नाही. कॅबिनेटमध्ये याची चर्चा होत नाही. डीजी आयजी यांची समिती असते. त्यांच्याकडे याचा निर्णय होतो.

आज सकाळी वळसे पाटील यांना भेट झाल्यावर त्यांना विचारले त्यावेळी पाटील यांनी सांगितले, शिंदेंना झेड सिक्युरिटी होती आणि आहे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना अधिक सुरक्षा होती. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितले त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकारच असे चालवायचे आहे की सर्व सत्ता केंद्रीत ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका घेतलेली दिसते. त्याला राज्यातल्या आणि केंद्रातल्या सहकाऱ्यांची संमती दिसते, असंही पवार म्हणाले.

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले: पाटील

मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. त्यामुळे आता भाजपमधील खदखद समोर आली आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. पण काही वेळानंतर भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला आहे.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात शिंदे गट भाजप एकत्र सत्ता स्थापन केली, पण अचानक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. आता मात्र कार्यकारणी बैठकीमध्ये भाजपमधील खदखद समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT