Sharad pawar news Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : खडकवासला धरण, कात्रज बोगदा ते तथाकथित पुणेकरांनी दिलेला त्रास; शरद पवार महात्मा फुलेंवर काय म्हणाले?

Sharad Pawar on Mahatma phule : पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती दर्शवली. शरद पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात महत्मा फुले यांच्या कार्याबाबत भाष्य केलं.

Saam Tv

सचिन जाधव, साम टीव्ही

शरद पवारांनी पुण्यातील कार्यक्रमात फुले दाम्पत्याचा संघर्षमय काळ सांगितला. फुले दाम्पत्य सामाजिक कार्य करत असताना त्यांना तथाकथित पुणेकरांनी त्रास दिल्याचं शरद पवारांनी अधोरेखित केले. महात्मा फुले यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याचा उल्लेख शरद पवारांनी भाषणातून केला. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेच्या वतीने पुस्तकाचे प्रकाशन झालं. शरद पवार यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन प्रकाशन झालं. शरद पवारांच्या पुण्यातील मोदीबाग येथील कार्यालयात पुस्तक प्रकाशन समारंभ पार पडला. या कार्यक्रमातील उपस्थितांना शरद पवारांनी संबोंधित केलं.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

मला आनंद आहे की, अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यात दाभोलकर यांनी आयुष्य घालवले. ते आता नाहीत. पण काम सुरू आहे. मिशनरी संकल्पना दुर्लक्षित करणे अवघड आहे. फुले यांनी त्याचा फायदा घेतला आणि शिक्षण सुरू केलं. फुले यांच्यावर अजून काम करण्याची गरज आहे. त्यांच्यावर सिनेमा काढले,काम सुरू आहेत. फुले दांपत्य यांनी संघर्ष केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचा कार्यकाळ संघर्षात गेला. जोतिबा फुले कन्स्ट्रक्शन लाइनमध्ये होते. खडकवासला धरण कामात पायभूत काम केलं. त्या काळात कात्रज बोगदाही त्यांनी केला. आज बोगदा बघितल्यानंतर किती कठीण काम फुले यांनी केले.

स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळी पंचम जॉर्ज देशात आला. त्यावेळी स्वागत कमान चिरकाल टिकेल अशी केली. ती कमान गेट ऑफ इंडिया आहे. स्वागतासाठी अनेक लोक होते. जॉर्ज आला, तेव्हा अनेक अधिकारी होते. स्वागताला एका टोकाला फुले उभे होते. ते त्यांच्या नेहमीच्या पेहरावात होते. पोलिसांनी त्यांना बाजूला काढले होते. त्यावेळी फुले यांनी जॉर्जच्या हातात निवेदन दिले. त्यात लिहिले होते की, राज्यात दुष्काळ आहे. लोकांना खडी फोडण्याचे काम दिले आहे. लोक दुष्काळामुळे संकटात आहेत. त्यांना अशी शिक्षा देऊ नका. त्यांना छोटे-मोठे तलाव बांधण्याचे काम दिले तर त्यांची सुटका होईल. हे काम करून चालणार नाही. वृक्ष तोडली तर पर्यावरणासाठी वृक्ष तोड थांबवा अशी मागणी होती.

आमच्या शेतकऱ्यांना चांगले बियाणे द्यावे. संकरित बियाणे देण्याची मागणी केली. त्यावेळी शेतकरी आणि दूरदृष्टिकोन असा होता. जोडधंदा दुधाचा सुरू केला. युनाइटेड वळू देऊन नवीन गायी तयार करावी. जोतिबा फुले चमत्कार होते. वेगवेगळ्या गोष्टीत त्यांना पत्नीची साथ होती. शिक्षणासाठी तथाकथित पुणेकर यांनी त्रास दिला.

मी पुस्तक वाचल्याशिवाय बोलत नाही, पण मला आता हे पुस्तक मिळाले आहे. हे पुस्तक वाचून नक्की कळेल. सर्व क्षेत्रात फुले दाम्पत्याचे योगदान आहे. सामाजिक वाचन होते. नवीन पिढीसाठी फुले आणि त्यांचं आयुष्य मार्गदर्शक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT