शरद पवारांनी ठरवलंय, 2024 मध्येही ठाकरे सरकारचं - जितेंद्र आव्हाड Saam Tv
मुंबई/पुणे

शरद पवारांनी ठरवलंय, 2024 मध्येही ठाकरे सरकारचं - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात (Maharashtra) २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकींना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) एकत्र सामोरे जाणार असून त्यावेळीदेखील मविआचेच सरकार अस्तित्त्वात येईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकींना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) एकत्र सामोरे जाणार असून त्यावेळीदेखील मविआचेच सरकार अस्तित्त्वात येईल. तसेच त्यावेळीदेखील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मनातीलचं मुख्यमंत्री होईल आणि पवारांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेहेच (Uddhav Thackeray) आहेत. असे गृहनिर्माण विभागाचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले आहेत. ते ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

हे देखील पहा-

नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक ही येत्या काही महिन्यात होण्याच्या शक्यता आहे. होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) विभागवार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करत होते. बोलत असताना, त्यांनी महाविकास आघाडी सरकार योग्यरित्या कारभार करीत आहे आणि 2024 नंतरही हेच सरकार येणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही

मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते. शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो, असे बाहेर पसरवले जात आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही. शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा ठाकरे यांना आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री असलेल्या पदाला मान दिला पाहिजे आणि तसेच ते घेजो निर्णय घेतील त्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. अशी शिकवण शरद पवारांनी आम्हाला दिली आहे. असे देखील आव्हाड यांनी यावेळी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

SCROLL FOR NEXT