mumbai shocking News  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

mumbai shocking News : मुंबईत शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ल झाल्याची घटना घडली आहे. नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Saam Tv

मुंबईत शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय

नेत्यावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

मयुर राणे, साम टीव्ही

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतही शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या पवईत शरद पवार गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष कैलास कुशेर यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झालाय.

कैलास कुशेर यांच्यावर आयआयटी बाजार रोडवर धारदार शस्त्राने सपासप वार करत हल्ला करण्यात आला. भर रस्त्यावर कुशेर यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात कुशेर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हिरानंदानी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

आयआयटी बाजाराच्या रस्त्यावर कुशेर यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर नेमका कुणी आणि का हल्ला केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरील दुकान, इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरू आहे.

शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला

तत्पूर्वी, केरळमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर शुक्रवारी हल्ला झाला. या हल्ल्यात वैयक्तिक सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी झालेत. शशी थरूर हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याने केरळमधील राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत पहिला मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढला

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT