Navi Mumbai Political news  Saam tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Navi Mumbai Political news : नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळली आहे. आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Vishal Gangurde

नवी मुंबईतील शरद पवार गटात जिल्हाध्यक्षपदावरून नाराजी

मागील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या मंगेश आमले यांना मोठी जबाबदारी दिलीये

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि संभाव्य बंडखोरीची चिन्हं

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबईतील महापालिका निवडणुकीआधी राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी उफाळली आहे. शरद पवार गटाच्या नवी मुंबईतही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे मंगेश आमले यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपावण्यात आलं आहे. यामुळे नवी मुंबईतील शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगेश आमले यांची नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मंगेश आमले यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, मंगेश आमले यांच्या बंडखोरीमुळे नाईक यांचा पराभव झाला होता. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला होता.

त्यानंतरही शरद पवार गटाने आता मंगेश आमले यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. यामुळे पक्षात असा सूर उमटतोय की, "बंडखोरी करणाऱ्यांना सन्मान आणि पद दिलं जातं, अशी नाराजी काही कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

नवी मुंबईत कोणत्या राजकीय पक्षात नाराजी उफाळली आहे?

नवी मुंबईतील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यपदावरून नाराजीचे वातावरण आहे.

कार्यकर्त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण काय आहे?

विधानसभा निवडणुकीत मंगेश आमले यांनी बंडखोरी केली. त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT