अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Sharad Pawar Shocks Raj Thackeray in Pune : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावर १०० कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. आज, रविवारी मनसेच्या १०० कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यातील मोदी बागेत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. चार महिन्यात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत, त्याआधीच मनसेला पुण्यात मोठं खिंडार पडले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. सर्वच पक्षाने स्थानिक पातळीवर मोट बांधण्यासाठी कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही तयारीचा आढावा घेतला जात आहे. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावरही आले होते. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला पुण्यात खिंडार पडले. १०० कार्यकर्त्यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पुण्यातील मनसे नेते रोहन गायकवाड त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत मनसेच्या १०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हा पुण्यात सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पुणे शहरात मनसेचा एकही आमदार नाही, त्यात काही महिन्यापूर्वी वसंत मोरे यांनीही साथ सोडली होती. आता त्यात कार्यकर्त्यांनीही जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे आगामी मनपाच्या निवडणुकीत नगरसेवक निवडून आणण्याचं आव्हान मनसेपुढे असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.