Ajit Pawar Faces Major Blow
Ajit Pawar Faces Major Blow Saam TV news

Ajit Pawar Setback : अजितदादांना सर्वात मोठा हादरा, ७ आमदारांनी साथ सोडली

Ajit Pawar setback, Nagaland political crisis : अजित पवार यांना नागालँडमधून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार एनडीपीपीमध्ये सामील झाले असून, एनडीपीपीचे संख्याबळ ३२ वर पोहोचले आहे. या बदलामुळे नागालँडचे राजकारण ढवळून निघाले आहे.
Published on

Ajit Pawar Faces Major Blow : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागालँडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रावादी काँग्रेसच्या नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली असून सत्ताधारी एनडीपीपीमध्ये प्रवेश केला आहे. ७ आमदारांनी एनडीपीपीमध्ये पक्षप्रवेश केल्याने मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखाली एनडीपीपी पक्षाला विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळाले आहे. अजित पवार गटाच्या विलिनिकरणामुळे एनडीपीपीचे विधानसभेतील संख्याबळ ३२ वर पोहोचले आहे.

नागालँडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आलाय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदार सत्ताधारी NDPP मध्ये विलिन झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदारांनी प्रवेश केल्यामुळे NDPP च्या आमदारांची संख्या २५ वरून ३२ वर पोहोचली आहे. NDPP ला आता भाजपच्या समर्थनाची गरज भासणार नाही.

कोण कोणत्या आमदारांनी साथ सोडली -

नमरी एनचांग – टेनिंग

पिक्टो शोहे – अतोइजू

वाई. मोहोनबेमो हम्तसोए – वोखा टाउन

वाई. मनखाओ कोन्याक – मॉन टाउन

ए. पोंगशी फॉम – लॉन्गलेंग

पी. लांगोन – नोकलाक

एस. तोइहो येप्थो – सुरुहोटो

 Ajit Pawar Faces Major Blow
Dhule Horror : बाप आहे की हैवान.. आईच्या डोळ्यासमोर दीड वर्षाच्या मुलाचा जीव घेतला, नंतर....

या विलीनीकरणामुळे NCP च्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण नगालँडमधील NCP चे सर्व आमदार यापूर्वी त्यांच्या गटात होते. नगालँड विधानसभेत सध्या कोणताही विरोधी पक्ष नसल्याने NDPP ची सत्ता आणखी मजबूत झाली आहे. या घडामोडीमुळे नगालँडच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

 Ajit Pawar Faces Major Blow
Pune Drunk Driver : दारूच्या नशेत सदाशिव पेठमध्ये १२ जणांना उडवले, चालकासह मालकाला बेड्या

नागालँडचे विधानसभा अध्यक्ष शारिंगेन लाँगकुमर यांनी दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद 4(2) आणि नागालँड विधानसभा सदस्य (दल-बदल अपात्रता) नियम, 2019 अंतर्गत याला मान्यता दिली. सर्व सात आमदारांनी NDPP मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने NCP ची विधानसभेतील संपूर्ण विधानपक्षाची रचना बदलली.

 Ajit Pawar Faces Major Blow
Vaishnavi Hagawane : निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांना मोठा पुरावा मिळाला, हगवणेंच्या अडचणी वाढल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com