Maharashtra cm new update| Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

अभिनंदन! एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली - शरद पवार

स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे यांची आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. शिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रीपदाची शपथ आजच घेणार असल्याचंही जाहीर केलं.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील शिंदे यांचे अभिनंदन केलं आहे. शरद पवारांनी शिंदे यांचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पवारांनी म्हटलं आहे, 'राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणुक करुन भाजपने आपण बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा गौरव केल्याचं एका बाजूने बोललं जात आहे. तर भाजपने या आधी शिवसैनिकाचा का सन्मान केला नाही असं देखील बोललं जात आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे, 'हिंदूत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे भाजपाला महत्त्व वाटत होते तर शिवसेनेचा मुख्यमंत्री २०१९ लाच का नाही बनवला?' असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून यावरती राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी मात्र आज उद्धव ठाकरे यांच्यावरती नव्याने जुनाच आरोप केला ते म्हणाले, '२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती होती.

या माध्यमातून भारतीय जनता पार्टी १०५ जागा सेनेने ५६ जागा जिंकल्या सेना भाजपसह अपक्ष आमदारांचे मिळून जवळपास १७० लोक निवडून आले होते. सर्वांना अपेक्षा होती की सरकार सेना आणि भाजपचे तयार होईल. शिवाय नरेंद्र मोदींनी भाजपचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा वारंवार केली होती.तरीदेखील दुर्दैवाने निकालानंतर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला आणि बा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. असं फडणवीस म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT