Maharashtra Political Storm, Ajit Pawar and Sharad Pawar SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra NCP Crisis: अजितदादांच्या बैठकीआधी शरद पवारांनी खेळली नवी चाल; राष्ट्रवादीचे आमदार परत येणार?

Satish Daud

Ajit Pawar vs Sharad Pawar Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आज अत्यंत निर्णायक दिवस आहे. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांनी आज स्वतंत्र बैठका बोलावण्यात आल्या आहेत. दोन्ही गटांकडून आमदारांना बैठकीला राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. अशातच  अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीपूर्वी शरद पवारांनी नवी चाल खेळली आहे.

मुंबईच्या वांद्रे एमईटीमध्ये अजित पवार दुपारी १२ वाजता आपल्या आमदारांची बैठक घेणार आहे. या बैठकीआधीच शरद पवार यांनी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे १२ आमदार सोडून पक्षातील सर्वच आमदारांना आपल्या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) यांची सुद्धा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये दुपारी १ वाजता बैठक होणार असून या बैठकीला आमदारांनी हजर राहावे, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४१ आमदारांना फोन देखील केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे अजित पवार यांनी आमदारांना बैठकीला हजर राहण्याच्या दिलेल्या सूचना आणि दुसरीकडे शरद पवार यांनी फोन करून दिलेला आदेश यामुळे नेमकं कुणाच्या बैठकीला जावं याबाबत आमदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, जे आमदार बैठकीला हजर राहणार नाही, त्यांच्यावर शरद पवार कारवाईचे आदेश देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार की शरद पवार कुणाचा व्हीप लागू होणार?

दरम्यान आजच्या बैठकीसाठी दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांनी देखील व्हीप जारी केला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT