Sharad pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : निवडणुकांच्या आधीच शरद पवारांची मोठी घोषणा, नवा डाव टाकला

Sharad Pawar News : निवडणुकांच्या आधीच शरद पवारांची मोठी घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी पवारांनी मोठा डाव टाकला आहे.

Vishal Gangurde

शरद पवारांकडून आगामी निवडणुकीत तरुणांना संधी देण्याची घोषणा

नेत्यांना जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य टाळण्याचा शरद पवारांचा सल्ला

महायुती सरकारवर पूरग्रस्त मदत अपुरी असल्याची शरद पवारांची टीका

रुपाली बडवे, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही आगामी निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. या निवडणुकीसाठी शरद पवारांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवारांचा नवा डाव महायुतीला डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षातील सदस्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी मोठी घोषणा केली. आगामी निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना संधी देणार. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देतील यासाठी प्रयत्न करा, असे शरद पवारांनी जाहीर केलं आहे. जातीय सलोखा ठेवा, ही महत्वाची सूचना देखील पवारांनी पदाधिकारी आणि नेत्यांना दिली आहे .

शरद पवार बैठकीत म्हणाले. 'स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका. सरकारमधील काही नेते आणि मंत्री सध्या वादग्रस्त बोलत आहेत. बोलताना प्रेमाची भाषा वापरा. आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घ्या, असे ते म्हणाले.

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.'कधीकाळी एक आमदार आपल्यासोबत होता, पण तो आता काय वक्तव्य करत आहेत हे सगळं माध्यमांवर येत आहे. त्यामुळे आपल्याला जातीय सलोखा हा बिघडवायचा नाही आहे, पूर्वी पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीजातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत हे अत्यंत चुकीच आहे, असेही शरद पवारांना सांगितले.

महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार का?

शरद पवार पुढे म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामीकाळात कशा प्रकारे युती करायची, याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार आहे. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडी बाबत निर्णय करावा'.यावेळी महायुतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवर शरद पवार यांनी टीका केली.

'अतिवृष्टीच्या संदर्भात जी राज्यसरकार मदत करत आहे, ती तटपुंजी मदत आहे. केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती. आमच्या वेळीस केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरघोस मदत देत होते. नरसिंह राव जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते राज्यात अतिवृष्टीच्या पाहण्यासाठी येणार होते. पण तेव्हा मीच त्यांना पाहण्यासाठी येऊ नका सांगितले. कारण शासकीय यंत्रणा तुमच्या दौऱ्यासाठी लागेल, त्यामुळे मदत ही होणार नाही,असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Kendra Trikona Rajyog: शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलून मिळणार घवघवीत यश

Dharmendra Death: महानतेचं उदाहरण...! धर्मेंद्र यांच्या निधनाने अमिताभ बच्चन भावूक, जिगरी दोस्तासाठी लिहिली खास पोस्ट

SCROLL FOR NEXT