Junnar Police Crime Saam TV
मुंबई/पुणे

संतापजनक! जुन्नरमध्ये महिलेकडे वाईट नजरेने पाहून पोलिसाचे लज्जास्पद कृत्य

तुमचा फोटो पाठवा, तुमचे वजन किती? उंची किती ? का? असे प्रश्न हवालदाराने विचारायला सुरुवात केली.

रोहिदास गाडगे

पुणे : जुन्नर येथील एका विवाहितेला पोलीस भरतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने जुन्नर पोलिसांत वाहतूक विभागात काम करणाऱ्या पोलिस हवालदाराने महिला एकटी आणि अडचणीत असल्याचा फायदा घेत तिच्याशी अश्लील चॅटिंग करत व्हिडीओ कॉल करून नग्न होऊन विक्षिप्त प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

महिलेने त्या हवालदाराला हे गैरकृत्य वेळीच थांबण्याची विनंती केली मात्र पोलीस हवालदार न थांबल्याने अखेर पिडित महिलेने पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन अखेर जुन्नर (Junnar) पोलिसांमध्ये त्या हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

गणेश जोरी असं या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पीडितेने थेट पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून जुन्नर पोलिसात धाव घेतली आणि ट्रॅफिक हवालदार पोलीस जोरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय विवाहित तरुणीचे शिक्षण १२ वी डीएड असून ती विविध ठिकाणी सूत्रसंचालनाचे काम करते. पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्तपत्रात पोलीस भरती बाबतची जाहिरात तिने वाचली होती. तिने १५ जूनला पोलीस भरती आहे त्यासाठी तिला मदत हवी होती.

यासाठी तिने आपल्या आईकडून जुन्नरमधील काही पोलिसांचे नंबर घेतले होते. पोलीस (Police) भरतीसाठी आपणाला मार्गदर्शन करावे, असं फोनद्वारे संपर्क करून विचारले होते. मात्र, या दरम्यान ३ जून रोजी जुन्नर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार गणेश जोरी या पोलिसाला पीडित महिलेने मोबाईलवर फोन करून भरतीबाबत मार्गदर्शन करा, अशी विनंती केली. गणेश जोरी यांनी ६ जून रोजी रात्री बाराच्या दरम्यान WhatsApp वर मेसेज करून आणि फोन करून पोलीस भरतीच्या शारीरिक तपासणीबाबत बोलायला सुरुवात केली.

यामध्ये त्याने पहिल्यांदा तुमचा फोटो पाठवा, तुमचे वजन किती? उंची किती ? असे अनेक प्रश्न विचारले परंतु पोलीस भरतीसाठी तो एक शारिरीक चाचणीचा भाग असेल असे समजून पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र ७ जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा जोरी याने पीडितेला व्हॉट्सअॅपवर कॉल करून वैयक्तिक माहिती विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे पटत नाही का? एकटेच राहता का ? तुमच्या नवऱ्याचे बाहेर काही चालू आहे? असेल तर ते कसे ओळखायचे? यासह अनेक अश्लील प्रश्न विचारले यावर पीडितेने लाजेने आपली मुलगी रडत आहे असे सांगून फोन कट केला. मात्र, या पोलीस हवालदाराच्या या कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT