Breaking: शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरण; तिन्ही आरोपींना जन्मठेप, फाशी नाहीच
Breaking: शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरण; तिन्ही आरोपींना जन्मठेप, फाशी नाहीच Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरण; तिन्ही आरोपींना जन्मठेप, फाशी नाहीच

सूरज सावंत

मुंबई - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार (Shakti Mill Rape Case) प्रकरणी आज मुंबई हायकोर्टने (Mumbai Highcourt) अंतिम निर्णय दिला आहे. 22 ऑगस्ट 2013ला मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला हातो. पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

हे देखील पहा -

शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरणात विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात आव्हान कोर्टानं दिलं होतं.

आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. त्यावर आज सुनावणी झाली. सुनावनीसाठी आरोपींना VC द्वारे हजर केले गेले. तर राज्यसरकारचे वकिल दिपक साळवी हे देखील या सुनावनीला उपस्थित होते. या गुन्ह्यात पीडित महिलेला शारीरिक तसेच मानसिक धक्का बसला होता. दरम्यान आज निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून तीनही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

Today's Marathi News Live : जगात भारी कोल्हापुरी, नरेंद्र मोदींचं कोल्हापुरात मराठीतून भाषण

Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Pravin Darekar On Onion News | कांदा निर्यातीवर प्रवीण दरेकरांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Priyanka Gandhi News | देशात मोठी बेरोजगारी आहे, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT