shahapur news  Saam tv
मुंबई/पुणे

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

Shahapur News update : शहापूरच्या एका शाळेत टॉयलेटमध्ये रक्त आढळल्याने विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासणी केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

फैय्याज शेख, साम टीव्ही

ठाणे : शहापूर शहरातील आर. एस. दमानिया शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानंतर शाळेतील मुलींना विवस्त्र करून अंतर्वस्त्र तपासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी मुलींना विवस्त्र करत तपासणी केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पालकांनी एकत्र जमून शाळेतील मुख्याध्यापकांना घेराव घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूरमधील या शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानंतर मासिक पाळीच्या संशयाने १० ते १२ मुलींना विवस्त्र करून अंर्तवस्त्र तपासल्याची घटना घडली आहे. १४ ते १५ वर्षीय विद्यार्थिनींना शाळा व्यवस्थापनाने विवस्त्र करून तपासणी केल्याची माहिती कळताच पालकांनी शाळा गाठली. त्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला.

शहरापूरमधील नामांकित शाळेतील या गंभीर प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिकेने इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत असल्याचं समोर येत आहे. शाळेने ५वी ते १०वी इयत्ता शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अत्यंत खालची पातळी गाठली आहे.

शाळेत विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर शाळेमध्ये पालक आणि शाळा प्रशासनात चांगलाच वाद पेटला आहे. घटनेनंतर सर्व पालकांनी एकत्र येत आर. एस. दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका घेतली. आता सर्व पालक शहापूर पोलिस ठाण्यात गेले असून मुख्याध्यापिकेला त्वरित अटक करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी रतनबाई दमानी शाळेतील मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. विद्यार्थिनींना विवस्त्र करणाऱ्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विश्वस्थ ,शिपाईसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर'च्या कमाईत घसरण, रितेश देशमुखच्या 'मस्ती 4'नं किती कमावले?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

Sabudana Chivda Recipe: उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबरे घालून कुरकुरीत साबुदाणा चिवडा कसा बनवायचा?

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT