
मुंबई : मिरारोडमध्ये अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर मनसैनिकाला अनेक धमक्या मिळाल्या. मनसैनिकाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मनसेने मिरारोडमधील मनसैनिकाला सुरक्षा पुरवली. या मनसैनिकाला दोन दिवस कार देखील पुरवली. तसेच दररोज सोबतीला मनसैनिक देखील होते. याच तरुण मनसैनिकाने त्या दिवशी नेमकं काय घडलं, याविषयी सविस्तर माहिती दिली.
मिरारोडमध्ये मनसैनिकाने व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. गुजराती व्यापाराच्या मारहाणीचे देशभरात पडसाद उमटले. या मारहाणीनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा काढला. अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर मराठी भाषिकांनी मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्च्याला हजारो मराठी भाषिकांनी हजेरी लावली. मनसे आणि शिवसेनेच्या पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण करणारा तरुणही सामील झाला होता. यावेळी या मनसैनिकाने एका वृ्त्त संस्थेशी संवाद साधला.
मिरारोडमधील मनसैनिकाने सांगितलं की, 'व्हिडिओ व्हायरल कसा झाला, मलाच कळलं नाही. मी मध्यमवर्गीय आहे. मला अनेक धमक्या मिळाल्या. या धमक्याविषयी कुणालाच सांगितलं नाही. तुला उचललं जाईल. मला ठार मारलं जाईल, अशा धमक्या मिळाल्या. मला माझे सहकारी घरी सोडवायला यायचे. मला स्पेशल गाडी दिली होती. दोन तीन दिवस मला सुरक्षा होती. मला माझ्या मनसैनिकांनी सुरक्षा पुरवली. आम्ही पोलिसांकडे गेलो नाही. मनसैनिक याबाबत तत्पर आहे. यामुळे वातावरण आणखी चिघळलं असतं. पोलिसांनी मराठी मोर्चाला आधीच परवानगी दिली असती, तर वातावरणही चिघळलं नसतं'.
ठाकरे बंधूंवर बोलताना मिरारोडमधील मनसैनिक म्हणाला की, 'एकत्र आल्याने आम्हाला तर आनंदच होईल. वादविवाद होत राहतात. राजसाहेबांनी महाराष्ट्र धर्माबाबत सांगितलं आहे. मराठी भाषिकांच्या मोर्चामध्ये सर्व पक्षातील लोकांनी हजेरी लावली. आमचेही पक्षीय पातळीवर वाद आहेत. पण महाराष्ट्र धर्म आधी आहे. महाराष्ट्रासाठी एकत्र व्हा'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.