Shahapur Shocking News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : सख्ख्या ३ लहान बहिणींचा मृत्यू, अन्नातून झाली होती विषबाधा; ठाण्यातील धक्कादायक घटना

Shahapur News : ठाण्यातील शहापूर तालुक्यातील चेरपोली गावात तीन ख्ख्या लहान बहिणींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या तिन्ही मुलींचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke
  • शहापूरमध्ये तीन सख्ख्या लहान बहिणींचा मृत्यू झाला आहे.

  • अन्नातून विषबाधा झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

  • आईची भूमिका संशस्यास्पद वाटल्याने पोलिसांनी मुलींच्या आईला ताब्यात घेतले.

फय्याज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Thane : ठाण्यातील शहापूरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहापूरमधील चेरपोली गावामध्ये सख्ख्या तीन लहान बहिणींना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णालयामध्ये उपचार सुरु असताना त्या तिघींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हद्यद्रावक घटनेमुळे शहापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काव्या संदीप भरे (वय १० वर्षे), दिव्या संदीप भरे (वय ८ वर्षे) आणि गार्गी संदीप भरे (वय ६ वर्षे) अशी विषबाधेमुळे मृतक पावलेल्या मुलींची नावे आहेत. मुलींची आई ही काही महिन्यांपासून शहापूर तालुक्याच्या असस्नोली या गावी तिच्या माहेरी तिन्ही मुलींना घेऊन आली होती. त्याच ठिकाणी मुलींना विषबाधा झाली.

अन्नातून विषबाधा झाल्यानंतर नातेवाईकांनी दोन मुलींना उपचार करण्यासाठी मुंबई येथील नायर रुग्णालयात दाखल केले होते, तेथे दोघींचा मृत्यू झाला. एका मुलीला नाशिक जिल्ह्यातील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिचाही आज (२५ जुलै) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलींच्या आईची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने किन्हवली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

आईसोबत आजोळी आलेल्या तीन सख्या लहान बहिणींचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये मुलींच्या आईची भूमिका ही पोलिसांना संशयास्पद वाटली, त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी तिन्ही मुलींच्या आईला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास किन्हवली पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT