Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या तरुणाचा शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड

Latest News: याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

Priya More

Pune News: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमामध्ये ही घटना घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. आरोपीने पीडित मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आले. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

संतप्त झालेल्या मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे तिच्या आईने तिला उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन गेली. त्यावेळी डॉक्टरांनी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकून मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या मुलीवर सध्या उपचार सुरु आहेत.'

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितले. मुलीने तिच्या आईला सांगितले की, घरा शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने दुकानातून घरी जाताना तिला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. जर यासंदर्भात कोणाला काहीही सांगितले तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी त्याने तिला दिली होती.

संतप्त झालेल्या मुलीच्या आईने नातेवाईकांसह शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. शिक्रापूर पोलिसांनी या अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: शिर्डी पोलिस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

SCROLL FOR NEXT