साकीनाका बलात्कार प्रकरणाचं गुढ वाढलं; कटात दोघे सामील असल्याचा संशय
साकीनाका बलात्कार प्रकरणाचं गुढ वाढलं; कटात दोघे सामील असल्याचा संशय Saam Tv
मुंबई/पुणे

साकीनाका बलात्कार प्रकरणाचं गुढ वाढलं; कटात दोघे सामील असल्याचा संशय

सुरज सावंत

मुंबई: साकीनाका (Sakinaka Rape Case) येथील घटनेत चाकूच्या धाकावर पीडीत महिलेवर अत्याचार आरोपीन केले आहेत. दोन व्यक्ती महिलेला धमकावत असल्याचा फोन जवळ काम करत असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने पोलिस नियंत्रण कक्षाला केला होता. पीडित महिला ही रात्री ८ वाजता साकीनाका येथील बहिणीच्या घरी गणपतीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. पोलिस दलात प्रथमदर्शी तरी एकच आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे. आरोपीनी अत्याचार केल्यानंतर तिच्या गुप्तांगात जखमा तर केल्याच पण तिच्यावर चाकूने वार ही केलेले आहेत. पीडित महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील महिला अत्याचाराचे सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी पुण्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराची प्रकरणे ताजी असतानाच काल मुंबई मध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईमधील साकीनाका परिसरात काल सकाळी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

सदर घटनेत महिलेच्या गुप्तांगात घालून रॉडसारखी वस्तू घालून महिलेला जखम पोहचवल्याची माहिती समोर आली होती. आरोपी मोहन चव्हान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर मोहन चव्हानचं CCTV फुटेज देखील समोर आलं आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपिला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातून रमेश जाधव यांनी घेतली माघार

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

Gujarat News: गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले, पोलिसांची धावपळ

SCROLL FOR NEXT