महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय SaamTV
मुंबई/पुणे

महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय

राज्यातील 50 महाविद्यालयातील 562 शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना होणार लाभ; आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावास मिळाली मंजुरी.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

एकूण अनुदानित 50 महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल असे 562 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेण्या 1 जानेवारी 2016 पासून लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार ना. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत यशस्वी पाठपुरावा केला. या कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती, रजा, वार्षिक 3% वेतनवाढ आदिबाबत राज्य शासनाची नियमावली लागू रहाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दि. 1 जानेवारी 2016 पासून 31 मार्च 2019 पर्यंत ही देयके अदा करण्यासाठी सुमारे 52.74 कोटी खर्च अपेक्षित आहे तर 1 एप्रिल 2019 पासून पुढच्या वार्षिक देयकांसाठी 80.64 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाने या प्रस्तावास एकमुखी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार तसेच महाविकास आघाडी मधील सर्व मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT