Corona Patients in Mumbai
Corona Patients in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दोन महिन्यांपू्र्वी मुंबईतील कोरोना (corona in Mumbai) रुग्णसंख्येच्या आलेखात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या बहुतांश निर्बंधातून राज्य सरकारने नागरिकांना मुक्त केल्याने दिलासा मिळाला होता. पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केलीय. १६ मे रोजी कोरोनाचे ७४ रुग्ण आढळून आले होते. परंतु गेल्या आठवड्यात कोरोनाचे ३०० हून अधिक रुग्ण (corona new patient) आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली. काल नव्या रुग्णसंख्येने पाचशेचा टप्पा (५०८) पार केला. त्यानंतर आजही कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊन ७३९ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत आणखी भर पडलीय.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज कोरोनाचे ७३९ नवे रुग्ण आढळले असून शू्न्य कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे कोरोनाची मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १,०६६,५४१ वर पोहोचली आहे. तर कोरोना मृत्यूंचा आकडा १९५६६ वर स्थिरावला आहे. दरम्यान, कोरोनाचे २९ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ५ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. तर आज २९५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १,०४४,००५ वर पोहोचली आहे.

दैनंदिन रुग्णांची वाढती संख्या

३१ मे - ५०६ मृत्यू-०

३० मे -३१८ मृत्यू-०

२९मे- ३७५ मृत्यू-०

२८ मे -३३० मृत्यू-०

२७मे-३५२ मृत्यू-०

२६ मे - ३५० मृत्यू -०

२५ मे-२१८ मृत्यू

२४मे- २१८मृत्यू -०

२३मे- १५० मृत्यू -०

२२मे -२३४ मृत्यू -०

२१मे - १९८ मृत्यू-०

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT