पुणे : ड्रग्ज Drugs प्रकरणात एनसीबीची NCB कारवाई सुरु असताना नबाब मालिकांनी समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. कोविड काळात मालदीव Maldives आणि दुबईत जाऊन बॉलीवुडमधील कलाकारांकडून वसुली केल्याचा गंभीर आरोप मलिकांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) परिवारावर केला आहे. चाकण येथील एका कंपनीच्या उद्घाटनावेळी माध्यमाशी बोलतांना त्यांनी हे आरोप केले. (Serious allegations of Nawab Malik against Sameer Wankhede)
हे देखील पहा -
मलिक म्हणाले 'सुशांत सिंगच्या Sushant Singh आत्महत्येनंतर समीर वानखडेंना केंद्र सरकारने NCB मध्ये आणले वानखेडेंनी इथे आल्यावर रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) या अभिनेत्रीला अटक केली चार हजार रुपयांच्या व्यवहाराच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि केवळ व्हाट्सअॅप चॅटच्या माध्यमातून अभिनेते आणि अभिनेत्रींना NCB च्या दारात उभे केले आणि त्यांच्या मध्ये एक दहशत निर्माण करण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले' असे आरोप नबाव मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडें आणि केंद्र सरकारवरती केले.
तसेच कोविड काळात फिल्म इंडस्ट्री Bollywood Industry मालदीव आणि दुबईमध्ये (Maldives Dubai ) होती याच काळात वानखेडेंच्या परिवारातील लोक मालदीव आणि दुबई मध्ये होते.तसेच वानखडे स्वतः दुबई मध्ये होते का? मालदीव ला गेले होते का? त्यांची लेडी डॉन मालदीव ला गेली होती का, असा आरोप त्यांनी समीर वानखडेंची बहिण जास्मिन वानखेंडेवरती टीका करत याचे उत्तर त्यांनी द्यावे तसेच आमचे स्पष्ट म्हणणे आहे हे वसुली मालदीव आणि दुबई मध्ये झाली असल्याचही ते म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.