Advocate Malati Pawar Passes Away at 68 Saam
मुंबई/पुणे

मुंबईतील कोर्टातच ज्येष्ठ महिला वकिलाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; पतीचा गंभीर आरोप

Advocate Malati Pawar Passes Away at 68: मुंबईतील वरिष्ठ वकील मालती रमेश पवार यांचा किल्ला कोर्टात ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. पतीचा गंभीर आरोप.

Bhagyashree Kamble

  • ज्येष्ठ वकील मालती रमेश पवार यांचं निधन.

  • किल्ला कोर्टात ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू.

  • पती रमेश पवार यांचा गंभीर आरोप.

मुंबईतील ज्येष्ठ महिला वकील मालती रमेश पवार यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील किल्ला कोर्टाच्या बाररूममध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. क्षणात त्या खाली कोसळल्या. त्यांनी त्यांच्या पतीला याबाबत माहिती दिली. मात्र, काही वेळानंतर त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या प्रकरणी वकील मालती पवार यांच्या पतीने गंभीर आरोप केले आहेत. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीनं केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मालती पवार या ठाण्यातील माजिवडा भागातील रहिवासी होते. गेल्या ३ दशकांपासून त्या कायदे व्यवसायात कार्यरत होते. बॉम्बे हायकोर्ट, फॅमिली कोर्ट तसेच इतर स्थानिक न्यायालयांमध्ये वरिष्ठ वकील यासह मध्यस्थ म्हणून काम करीत होते.

घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास एका प्रकरणाबाबत प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी किल्ला कोर्टात गेल्या होत्या. त्यांनी काम पाहिलं. कोर्टात पोहोल्यानंतर त्यांना काही वेळ अस्वस्थ वाटू लागलं. याकारणामुळे विश्रांती घेण्यासाठी त्या बाररूममध्ये गेल्या. अस्वस्थ वाढत गेल्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पतींना दिली. त्यांनी फोन करून याबाबत माहिती त्यांना दिली. 'माझी तब्येत बिघडली आहे. मी काही वेळ बसते', असं त्या म्हणाल्या.

मात्र, पतीसोबत बोलणं झाल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मालती पवार यांना खासगी रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. याबाबतची माहिती मिळताच पती रमेश पवार यांनी रूग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी न्यायालय व्यवस्थेकडे संताप व्यक्त केला. मालती पवार यांना वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रमेश पवार यांनी केला.

'किल्ला कोर्ट असो किंवा इतर न्यायालय, तेथे डॉक्टर, फर्स्ट एड किंवा ऑक्सिजन सिलेंडर यांसारख्या मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. मालती पवार यांना तात्काळ उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचला असता', असं रमेश पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Vanga: बाबा वेंगांनी सांगितली 2026 मधली तिसऱ्या महायुद्धापासून एलियन्सपर्यंतची भाकीतं

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या श्रावणी व साहिलने पटकावले सुवर्णपदक

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

SCROLL FOR NEXT