मुंबई लोकलमध्ये बाप्पा विराजमान... जयश्री मोरे
मुंबई/पुणे

मुंबई लोकलमध्ये बाप्पा विराजमान...

घाटकोपरच्या गंगावाडीमध्ये रहाणाऱ्या राहुल वरीया या कलाकाराने आपल्या घरातील गणपती बाप्पा हा चक्क मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये विराजमान केला आहे.

जयश्री मोरे

मुंबई: कोरोना संकटामुळं मुंबईतील लोकल सर्वांसाठी अद्याप सुरू झाल्या नाहीत. लशीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांनाच सध्या प्रवासाची मुभा आहे. अजूनही अनेक लोक मुंबई लोकलने प्रवास करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हाच विषय घेऊन मुंबईतील तरूणानं लोकलचा देखावा साकारलाय. याच लोकलमध्ये लाडका बाप्पा विराजमान झालाय. (See this beautiful scene of Ganpati Bappa based on the theme of Mumbai's local train)

हे देखील पहा -

घाटकोपरच्या गंगावाडीमध्ये रहाणाऱ्या राहुल वरीया या कलाकाराने आपल्या घरातील गणपती बाप्पा हा चक्क मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये विराजमान केला आहे. वरीया कुटुंब गेले ९ वर्ष घाटकोपरमधील गंगावाडी येथील गोपाळ भुवनमधील घरात गणपती बसवीत आहेत. मात्र त्यांच्या घरातील गणपती आणि आरास ही विशिष्ट असते. कारण त्यांची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि आरास हे स्वतः अपलाईड आर्टचे विद्यार्थी असलेले राहुल हेच करीत असतात.

मुंबई लोकलमध्ये बाप्पा विराजमान...

यंदा त्यांनी सुमारे ४ फूट लांब आणि २ फूट उंच मुंबईच्या लोकलचा घाटकोपर रेल्वे स्थानकात उभा डब्बा बनविला आहे. यात घाटकोपर रेल्वे स्थानक आणि लोकलच्या डब्यात १ फुटाची गणपतीची शाडूच्या मातीची मूर्ती विराजमान आहे. कागद, सनबोर्ड आणि कागदी स्ट्रॉ च्या सहाय्याने मिनियेचर कलेच्या माध्यमातून सुंदर अशी लोकल आणि स्थानक त्याने तयार केली आहे.

गेले महिनाभर आधी स्केच बनविणे, बारकावे शोधणे आणि मग या वस्तूंच्या सहाय्याने ही लोकल बनविणे हे काम राहुल आणि त्याचे सहकारी दोन मित्रांनी हा अतिशय सुंदर देखावा तयार केला आहे. गेले दोन वर्षे मुंबईची ही जीवनवाहिनी असलेली लोकल सामान्यांसाठी बंद आहे. यंदाचा गणपती बाप्पा हा या लोकल मधूनच लोकांची संकटे दूर करण्यास आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT