'या' एसटी चालकाची हिम्मत तर बघा ! पुलावरून पाणी जात असतान घातली बस
'या' एसटी चालकाची हिम्मत तर बघा ! पुलावरून पाणी जात असतान घातली बस  राजेश भोस्तेकर
मुंबई/पुणे

'या' एसटी चालकाची हिम्मत तर बघा ! पुलावरून पाणी जात असतान घातली बस

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड जिल्ह्यात (Raigad District) 12 जुलै रोजी अतिवृष्टीने मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे जिल्ह्यातील नद्याही ओसंडून धोक्याची पातळी ओलांडून वाहत होत्या. महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातील नद्याही ओसंडून वाहू लागल्या होत्या. रस्त्यावरून नदीचे पाणी ओसंडून वाहत असताना खाडी पट्यातून महाडकडे येणाऱ्या एसटी बस चालकाने प्रवाशांचा आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून बस पाण्यात टाकली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना न घडता बस चालकांना एसटी बस सुखरूप बाहेर काढली. मात्र पाणी रस्त्यावरून वाहत असताना अशी बेफिकीर करणे योग्य नाही.

रायगड जिल्ह्याला दोन दिवसापासून पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाने सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्याही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. असे असतानाही महाड एसटी आगारातील एका बसचालकाने आपला आणि प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला होता.

खाडी पाट्यातून एसटी बस चालक हा दुपारी काही मोजक्या प्रवाशांना घेऊन महाड कडे येत होता. त्यावेळी खाडी पट्यातील नद्या ह्या मुसळधार पावसाने ओसंडून रस्त्यावर वाहू लागल्या होत्या. खाडी पट्यावरील पुलावरून नदीचे पाणी वाहत होते. हे दिसत असूनही बस चालकाने या पाण्यातून बस टाकली. काही क्षण ही बस पुलाच्या मधोमध अडकली त्यामुळे प्रवाशाचाही काळजाचा ठोका चुकला, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना न होता बस बाहेर आणली.

गोरेगावमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी बस चालकाने पूरस्थिती असताना बस पाण्यात टाकून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला होता. मात्र सुदैवाने कोणतीही घटना घडली नव्हती. 12 जुलै रोजी पुन्हा एसटी बस चालकाने पाण्यातून बस चालविण्याचे धाडस करून स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT