Siddhivinayak Ganapati Mandir Saam Tv
मुंबई/पुणे

सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ, ११ मेपासून 'या' गोष्टींना बंदी, भारत पाकिस्तान युद्ध तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Siddhivinayak Temple News: भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Bhagyashree Kamble

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून मंदिरात बाहेरून नारळ, हार, आणि प्रसाद आणण्यावर बंदी लागू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार आणि भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मंदिराचे विश्वस्त भास्कर शेट्टी म्हणाले की, 'सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी आम्हाला नारळ आणि इतर नैवेद्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत'.

श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले, 'सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अलिकडेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक झाली.

यावेळी सरकार आणि पोलिसांनी आम्हाला काही सुचना दिल्या. सुरक्षा उपयांबाबत माहिती दिली. भाविकांची तपासणी केली जाऊ शकते. पण देवाला अर्पण केलेल्या फुलांची आणि नारळाची तपासणी केली जाऊ शकत नाही. भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे'.

११ मे पासून याची अंमलबजावणी करण्यात येत असून, यासंदर्भात फुले विक्रेत्यांशी चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. “भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस आणि मंदिर ट्रस्टची आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावे.” असे आवाहन यावेळी सदा सरवणकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT