Mumbai Thane Palghar schools closed due to heavy rain today : राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज (शनिवार, ४ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता पालकांनी विनाकारण मुलांना बाहेर पडू देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या भागांतील शाळा राहणार बंद -
हवामान विभागाच्या 'रेड अलर्ट'च्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून खालील महानगरपालिका आणि तालुका क्षेत्रात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र, रायगड, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर, मुरबाड, पालघर, वसई आणि विरार परिसरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवार रात्रीपासून कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये शनिवारी बंद राहतील. मुंबईत पावसाचा हाय अलर्टही जारी करण्यात आला असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवसांत मुंबईसह पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ४ आणि ५ जुलै रोजी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
पालघरसाठी हेल्पलाइन क्रमांक
02525-297474
+91 82379 78873
ठाणे महानगरपालिका
०२२-२५३६४७७९,
०२२-२५३०१७४०
+९१ ९३७२३३८८२७
पनवेल
०२२-२७४५८०४०,
०२२-२७४५८०४१
०२२-२७४५८०४२
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.