school bus driver physically abused 11 years old school girl in tilak nagar mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: स्कूलबस चालकाचा ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार; मुंबईतील संतापजनक घटना

Mumbai Crime News: टिळकनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम स्कूल बस चालकाने ११ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

Satish Daud

Mumbai Crime News

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिला अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचं प्रमाण सर्वाधिक आहेत. एकीकडे मुंबई पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे टिळकनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम स्कूल बस चालकाने ११ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) ३२ वर्षीय आरोपी बसचालकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शाळा संपल्यानंतर स्कूल बसमधून घरी परतत होती. यावेळी बसमध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी बसचालकाने तिला मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ (Crime News) दाखवले. इतकंच नाही, तर आरोपीने बस लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कारशेड परिसरात नेली.

तिथे तिच्यावर स्कूल बसमध्येच लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, घरी आल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपी बसचालकाविरोधात लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत करण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT