Election Commission protest  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

Election Commission protest : मतदारयाद्यांमधील घोळ समोर आल्यानं विरोधकांनी निवडणुक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय... सत्याचा मोर्चाच्या माध्यमातून विरोधक थेट निवडणुक आयोगाला इशारा देणार आहेत... मात्र या मोर्चाआधी विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काय रणनिती आखलीय? सत्याचा मोर्चा कसा होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

व्होटचोरीच्या मुद्द्यावरून विरोधक निवडणुक आयोगाविरोधात एकत्र आलेत....मतदार याद्यांमधल्या घोळांमुळे निवडणुक आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी 1 नोव्हेंबरला विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा केलीय. अशातच या मोर्चाआधी झालेल्या बैठकीत विरोधकांनी निवडणुक आयोगाला घेरण्यासाठी कोणती रणनीती आखलीय पाहूयात....

बोगस मतदारांना वगळलं जात नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधकांचं एकमत झालयं...1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर निवडणुक आयोगाविरोधात अधिक आक्रमक भूमिका मांडणार आहेत..विरोधी पक्षातील प्रमुख नेते निवडणुक आयोगापुढे केलेल्या मागण्या मोर्चातून जाहीरपणे जनतेसमोर मांडून मोठा खुलासा करणार...

दरम्यान मोर्चासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे.. सत्याचा मोर्चाचा रुट कसा असेल पाहूयात...

असा असेल 'सत्याचा मोर्चा' -

फॅशन स्ट्रीटवरून मोर्चाला सुरुवात होणार आहे.. तर 'कामा हॉस्पिटल, किला कोर्ट मार्गावरून मोर्चा पुढे जाणार. त्यानंतर महापालिका मुख्यालयासमोरील व्यासपीठावर विरोधी पक्षाचे नेते जनतेला संबोधित करतील..

सत्याचा मोर्चानंतर विरोधक व्होटचोरीबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहेत.. मात्र एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोग कामाला लागलाय.. तर त्याचवेळी मतदार याद्यांतील घोळ न सोडवल्यास निवडणुका नको, अशी भूमिका विरोधकांनी घेतल्यानं मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे..

आता निवडणूक आयोग विरोधकांच्या मागण्या मान्य करतो का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया कशी राबवली जाते? बोगस मतदारांबद्दल विरोधक कोणता मोठा खुलासा करतात? याकडे राज्याचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT