Sassoon Hospital Saam Digital
मुंबई/पुणे

Sassoon Hospital : 'ससून'चा आणखी एक कारनामा; डॉक्टरच उठला रुग्णांच्या जीवावर, 'साम'च्या बातमीनंतर डॉक्टरचं निलंबन

Girish Nikam

पुण्यातील ससून रुग्णालय म्हणजे वादाचं माहेरघर...कधी ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींचा अड्डा तर कधी हिट अँण्ड रन केसमध्ये आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचा कारनामा..हे कमी होतं की काय म्हणून आणखी एक संतापजनक प्रकार या रुग्णालयात घडलाय. बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी ससूनचे डॉक्टरच त्यांना रात्री निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सामाजिक कार्यकर्त्यांनी सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर ससूनच्या प्रशासनाला जाग आली. याप्रकरणी डॉ. आदी कुमार यांचं निलंबन करण्यात आलंय. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

तर दुसरीकडे मात्र वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टरच्या कृत्याचं समर्थन करत पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यातले दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. दोन्ही पाय गमावलेल्या एका रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये दाखल केले होते. परंतु दुसऱ्या दिवशी तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. शंका आल्यानं त्यांनी डॉ. आदी कुमारवल पाळत ठेवली. त्यानंतर डॉ. आदी कुमार यांनी असा प्रकार एका रुग्णासोबत केला आणि त्यांच्या पर्दाफाश झाला. आदी कुमार यांचं बिंग कसं फुटलं ते पाहूयात.

नेमका काय संवाद झाला डॉक्टर आणि रितेश यांच्यात?

दादासाहेब यांनी दाखल केलेला एक रुग्ण ससूनमधून गायब झाल्याने संशय

रितेश गायकवाड यांना सोबत घेऊन रचला सापळा

पहाटेच्या सुमारास रितेश हॉस्पिटलबाहेर रिक्षा घेऊन गेले

डॉ. आदी कुमार आले आणि त्यांनी दोन्ही पाय गमावलेल्या रुग्णाला निर्जन स्थळी सोडण्यास सांगितलं

डॉ. आदी -एका रुग्णाला सोडून येणार का?

रितेश- कुठे सोडायचं?

डॉ. आदी- इथून लांब नेऊन ,सोड. पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी सोडून ये.

रितेश -नेमकं कुठे सोडू? मी एकटा कसा सोडू? नातेवाईक नकोत का सोबत...?

डॉ. आदी तू नवीन आहेस रे, आमचा नेहमीचा रिक्षावाला 500 रुपये दिले की बरोबर सोडून येतो....

स्वतः डॉ. आदी कुमार एका कर्मचाऱ्यासोबत स्वतःच्या कारमधून गेले

रुग्णाला भर पावसात एका झाडाखाली सोडून डॉ. आदी कुमार निघून गेले.

यापूर्वीही ससून रुग्णालय अनेक गैरकारभारामुळे वादात सापडलंय. मात्र गैरप्रकारांची मालिका काही थांबायला तयार नाही. आदी कुमारसारख्या निर्ढावलेल्या असंवेदनशील डॉक्टरांमुळेच सरकारी आरोग्य यंत्रणांचे तीन-तेरा झाले असून सामान्य रुग्णांची परवड होतेय. असे प्रकार थांबवण्य़ासाठी अशा असंवेदनशील डॉक्टरांवर कठोर कारवाईची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT