Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'मुंडे भावडांनी परळीतली जमीन बळकावली'; ऐन निवडणुकीत सांरगी महाजनांचा गंभीर आरोप, VIDEO

sarangi mahajan : दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून सारंगी महाजन यांची कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन हडपली असा आरोप आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंभीर आरोप झाल्यानं खळबळ उडाली आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मुंबई : राज्यात निवडणुकीची धामधूम शिगेला पोहचलीय. या निवडणुकीच्या धामधुमीत मुंडे-महाजन यांच्यातील जमिनीचा वाद समोर आलाय. आमदार पंकजा मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे या भावंडांवर फसवणुकीचे आरोप झालेत. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी जमीन लाटल्याचे खळबळजनक आरोप केलेत.

परळी तालुक्यातली जिरेवाडीमधली जमीन कटकारस्थान करुन पंकजा आणि धनंजय मुंडेंनी संगनमताने लुबाडली आहे. घरगड्याच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. परळी शहर पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याची तक्रार सारंगी महाजन यांनी केलीये. या आरोपांबाबत पंकजा मुंडेंशी संवाद साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

लोकसभेला पंकजा मुंडेचा पराभव झाला. आता विधानसभेला धनंजय मुंडे रिंगणात आहेत. निवडणुकीमुळे बीडमधील राजकारण तापलंय. त्यात सारंगी महाजन यांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाल्या सारंगी महाजन पाहूयात

परळीच्या जिरेवाडीतील 63.50 गुंठे जमीन कटकारस्थान करुन बळकावली

गोविंद बालाजी मुंडेंच्या माध्यमातून धनंजय आणि पंकजा मुंडेंनी जमीन हडपली

परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार मात्र अद्यापही गुन्हा दाखल नाही

अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात 18 ऑक्टोबर 2024 रोजी दावा दाखल

प्रतिवाद्यांना नोटीस, 25 नोव्हेंबर पुढील सुनावणी

धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर सारंगी महाजन यांच्या आरोपांमुळे विरोधकांना टीकेचा आणखी एक मुद्दा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT