अनिल देशमुख प्रकरण : दोन्ही स्वीय साहाय्यकांना १ जुलैपर्यंत ईडी कस्टडी Saam Tv
मुंबई/पुणे

अनिल देशमुख प्रकरण : दोन्ही स्वीय साहाय्यकांना १ जुलैपर्यंत ईडी कस्टडी

ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना अनिल देशमुख यांचे २ स्वीय साहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी संजीव पालांडेंना व कुंदन शिंदेंना १ जुलैपर्यंत ईडी कस्टडी सुनावण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर केलेल्या १०० कोटी कथित वसुलीप्रकरणाचा तपास ईडीकडून ED सुरु आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना अनिल देशमुख यांचे २ स्वीय साहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी संजीव पालांडेंना Sanjeev Palande व कुंदन शिंदेंना Kundan Shinde १ जुलैपर्यंत ईडी कस्टडी custody सुनावण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान ईडीच्या वकिलांनी अनेक मोठमोठे दावे देखील केले आहे. Sanjeev Palande and Kundan Shinde in ED custody till July 1

बदल्यांबाबत सांगताना कुंदन यांच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली की, पोलीस  अधिकार्यांच्या बदल्यांबाबतचा निर्णय हा पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्ड घेतात. ज्याचे अधिकार हे गृहसचिव, पोलीस महासंचालक यांची कमिठी असते. त्यात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. गृहमंत्री हे फक्त ती फाईल साईन करून पुढे मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर पाठवतात. जर बदल्यांसाठी देशमुख जबाबदार असतील तर कुंटे आणि जैयस्वाल यांना सह आरोपी बनवणार का ? असा युक्तीवाद कुंदन यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

हे देखील पहा -

सचिन वाझे हे पोलीस दलाचे आहेत. वसूलीच्या कामाचे विभाजन हे देखील शिस्तबद्धपणे करण्यात आले होते. मुंबई पोलीस दलातील जेवढे झोन आहेत त्यानुसार एक वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती आणि त्या यंत्रणेमार्फत पैसे गोळा केले जात होते. हे सगळे पैसे वाझे यांच्या मार्फत कुंदन शिंदे यांच्यापर्यंत जायचे. Sanjeev Palande and Kundan Shinde in ED custody till July 1

तसेच पालांडे हे संपूर्ण व्यवहाराबाबत चर्चा करायचे. पैसे कुठून यायचे आणि ते कुठे जायचे याबाबतचा सविस्तर कागदपत्रांसह ईडीचे वकील युक्तीवाद करत आहेत. ईडीच्या वकिलांचा कुंदे  आणि पालांडे यांची जास्तीत जास्त दिवस ईडी कस्टडी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा संपूर्ण युक्तीवाद पैशांचा अफरातफरबद्दल आहे. वा्जेंनी बार मालकांकडून जे पैसे गोळा केले गेले आहेत. ते ४ कोटी ७० लाख हे कुंदन यांना देण्यात आले.

ईडीच्या वकिलांनी कोर्टात केलेले पाच मोठे दावे

1) डिसेंबरमध्ये सचिन वाझेला ४० लाख रुपये गुडलक मनी देण्यात आले

2) वाझेला मुंबई पोलिसांच्या झोन १ ते झोन ७ कडून १ कोटी ६४ लाख रुपये दिले गेले.

3) पब, बार,ऑर्केस्ट्राद्वारे झोन ८ ते १२ कडून तब्बल २ कोटी ६३ लाख रुपये देण्यात आले. हे सर्व पैसे सचिन वाझेला यांना देण्यात आले होते. वाझेने हे सर्व पैसे अनिल देशमुख यांना देण्यात येणार असे सांगितले.4) डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ४  कोटी ७० लाख रुपये गोळा करण्यात आले. हे पैसे देशमुखांचे सचिव कुंदन शिंदे यांना दिल्याचे  वाझेने जबाबात सांगितले.

5) वेगवेगळ्या बदल्यांमधून पोलीस अधिकाऱ्यांकडूनही पैसे उकळल्याचा वकिलांचा दावा केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

SCROLL FOR NEXT