पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध, असे असतील नियम......

शहरात कोरोनाची संख्या पुन्हा वाढू लागल्याने तसेच डेल्टा व्हायरसचा धोका राज्यात पुन्हा निर्माण झाल्याने येत्या सोमवारपासून (ता. २८) नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध
पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध- Amol Kavitakar
Published On

पुणे : शहरात कोरोनाची संख्या पुन्हा वाढू लागल्याने तसेच डेल्टा व्हायरसचा धोका राज्यात पुन्हा निर्माण झाल्याने येत्या सोमवारपासून (ता. २८) नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

या नुसार खालील निर्बंध शहरात राहणार आहेत

  • - सर्व अत्यावश्यक सर्व दिवस दुपारी चार पर्यंत खुल्या

  • - अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरु. शनिवार-रविवार पूर्ण बंद

  • - माॅल, सिनेमागृहे पूर्ण बंद

  • - रेस्टाॅरंट, बार, फूट कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार. त्यानंतर व शनिवारी आणि रविवारी रात्री ११ पर्यंत पार्सल सेवा व होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार

  • - सार्वजनिक ठिकाणे (उद्याने) खुली मैदाने, सायकलिंग आठवड्यातले सर्व दिवस स. ५ ते सकाळी ९ पर्यंत सुरु राहणार

  • - जीम, स्पा पूर्वनियोजित वेळेनुसार दु. ४ पर्यंत सुरु राहणार

  • - सूट देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व कार्यालये ५० टक्के क्षमतेने दुपारी चार पर्यंत सुरु राहणार

  • - शाळा महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंद राहणार

  • - पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार

  • - मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दु. ४ वाजेपर्यंत सुरु राहणार व शनिवार, रविवारी होम डिलिव्हरीला परवानगी

    हे देखिल पहा......

सार्वजनिक व अन्य कार्यक्रमांसाठी -

  • - सामाजिक, धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करता येणार

  • - या कार्यक्रमांचा कालावधी ३ तासांपर्यंत मर्यादित

  • - सदर ठिकाणी खाद्यपदार्थ सेवनाला बंदी

  • - धार्मिक स्थळे पूर्ण बंद, पुजा अर्चा सुरु राहणार

  • - लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत परवानगी

  • - अंत्यसंस्कार, दशक्रिया विधींना २० जणांची उपस्थिती

  • इन सिटू बांधकामांना परवानगी राहणार आहे. ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय नाही अशा ठिकाणी दुपारी ४ पर्यंत बांधकामांना परवानगी राहील. ई सेवा (ईकाॅमर्स) सुरु राहणार आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com