Sanjay Shirsat On Ajit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Shirsat On Ajit Pawar: ...तर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट स्पष्टच बोलले

Sanjay Shirsat On Ajit Pawar: 'अजित पवार यांनी आमची विचारधारा स्वीकारली तर मुख्यमंत्री व्हायला त्यांना वेळ लागणार नाही, असा दावा शिरसाट यांनी केला.

सूरज सावंत

Sanjay Shirsat News: अजित पवार यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री व्हायच्या इच्छेवरील विधानावर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवार यांनी आमची विचारधारा स्वीकारली तर मुख्यमंत्री व्हायला त्यांना वेळ लागणार नाही, असा दावा शिरसाट यांनी केला. (Latest Marathi News)

संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिरसाट यांनी राज्यातील विविध घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी शिरसाट यांनी अजित पवारांच्या मुलाखतीमधील विधानावर भाष्य केलं.

शिरसाट म्हणाले, 'अजित पवारांना आमच्या शुभेच्छा. ते एक हार्ड वर्कर आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत ते काम करत असतात. त्यांना आमची एक विनंती आहे, अजित पवार यांनी आमची विचारधारा स्वीकारली तर मुख्यमंत्री व्हायला त्यांना वेळ लागणार नाही. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट द्यावी'.

'महाविकास आघाडीचा आता पर्याय अजित दादांना राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टात आता केस आहे. त्यात ते 14 आमदार देखील अपात्र होतील. आम्ही एकालाच ठेवलेला आहे, बाकी आम्ही अपात्रेबाबत न्यायालयात धाव घेतलेली आहे. एका आमदारात मुख्यमंत्री होता येतं का ? असा सवाल शिरसाट यांनी केला.

'अजितदादांची देखील मानसिकता आता महाविकास आघाडी सोबत राहण्याची नाही. मुख्यमंत्री हा एकच असतो आणि एकच राहणार. मागेही सांगितलेलं आहे की पुढच्या सभेत अजित पवार यांना खुर्ची राहणार नाही. आजच्या सभेतून दिसेलच एकूणच अजित पवारांना महाविकास आघाडीतून बाहेर काढलं जाण्याचा मानस हा केलेला आहे, असा दावा देखील शिरसाट यांनी केला.

'एमपीएससी परीक्षेची हॉल तिकीट लीक झालेली आहेत? यात सरकारचा कुठलाही हात नसतो. या एजन्सीच्या कारभारात सरकार कधी हात घालत नाही. याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. याबाबत दोषींवर कठोर गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही शिरसाट म्हणाले.

'मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आम्ही जो संजय राऊत आणि विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा अहवाल लवकरच येतो आहे. मात्र, आम्ही ठाण्याच्या वेड्याच्या रुग्णालयात देखील जाणार आहोत. त्या ठिकाणी एक बेड हा देखील राखीव ठेवणार आहोत. या मूर्खाचा बाकीच्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही एक बेड रिकामा ठेवणार आहोत. जळगावच्या सभेहून थकून आला की त्याची जर इच्छा असेल तर आम्ही तिथे त्याला अॅडमिट करून घेऊ, अशी टीका शिरसाट यांनी केली .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: विरारच्या रमाबाई इमारती दुर्घटनाप्रकरणी सहायक आयुक्त गिल्सन गोंसालविस अटक

Igatpuri Travel: कडाक्याची थंडी अन् दाट धुकं, इगतपुरीतील हे ठिकाण पर्यटकांसाठी ठरतय आकर्षण

EPFO: खासगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं

Amol Kolhe : "यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..."; IndiGo एअरलाइनचा सावळा गोंधळ पाहून अमोल कोल्हे संतापले

SCROLL FOR NEXT