Wrestlers Protest : कुस्ती संघाच्या अध्यक्षांविरुद्ध पुन्हा आंदोलन, 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार

कुस्ती संघाच्या अध्यक्षांविरुद्ध पुन्हा आंदोलन, 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार
Wrestlers Protest
Wrestlers ProtestSaam TV
Published On

Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद पुन्हा तापताना दिसत आहे. देशातील नामांकित ऑलिम्पियन कुस्तीपटू रविवारी सोनीपतहून दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचले असून त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे.

आंदोलक कुस्तीपटूंनी सांगितले की, महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दिली होती, मात्र अद्याप ती नोंदून घेण्यात आली नाही. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

तसेच अडीच महिने वाट पाहूनही अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं ते म्हणाले आहेत.  (Latest Marathi News)

Wrestlers Protest
Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut : 'संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय', राऊतांच्या विखे पाटीलांचा पलटवार

सरकारने आपली फसवणूक केल्याचे कुस्तीपटूंनी सांगितले. महिनाभरात कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र आता तीन महिने उलटूनही तपास अहवाल जाहीर झालेला नाही. किती दिवस वाट बघायची, असं त्यांचं म्हणणं आहे.

सात महिला कुस्तीपटूंनी केली तक्रार

सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करत आहोत आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल. हरियाणा आणि बाहेरील कुस्तीपटूंकडून एकूण 7 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Wrestlers Protest
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

काय आहेंत कुस्तीपटूंचे आरोप

रेसलर फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी अश्लील भाषेचा वापर करून खेळाडूंना शिवीगाळ केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. आम्ही इथे खेळायला आलो आहोत, असे पैलवानांनी सांगितले होते.

कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केला आहे, असं ती म्हणाली आहे. तसेच ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे ती म्हणाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com