sanjay raut and varsha raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : राऊतांच्या घरात आनंदाचं वातावरण; पत्नी वर्षा राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांनी 'आम्हाला खूप आनंद झाला आहे, असे सांगितले आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांना 'पीएमएलए' कोर्टानं आज, अखेर जामीन मंजूर केला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांना तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर आज, बुधवारी संजय राऊत तुरुंगातून बाहेर येणार आहे. संजय राऊतांची (Sanjay Raut) सुटका होणार आहे, यावर त्यांची पत्नी वर्षा राऊत त्यांनी आम्हाला खूप आनंद झाला आहे, असे सांगितले आहे.

सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता.

त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. ईडीने (ED) केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यामुळे राऊतांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. राऊतांची सुटका होणार, यावर त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वर्षा राऊत म्हणाल्या, 'आम्हाला खूप आनंद झाला आहे. साहेब कधी येणार याची वाट पाहतोय. खूप लोकांचे फोन आले. त्यांची अभिनंदन व्यक्त केले आहे'. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांची आई यांना फोन करून अभिनंदन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; एकनाथ शिंदेंनी दोन नगरपरिषदांवर भगवा फडकावला

Maharashtra Nagar Palika Election Result Live: वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदावर एमआयएमचा झेंडा

Konkan Politics: कोकणात भाजपला हादरा, कणकवलीच्या नगराध्यपदी पारकर

Shubman Gill: शुभमन गिलच्या नावावर का बसली कात्री? रिपोर्टमधून सत्य कारण अखेर समोर

बांगलादेश पुन्हा पेटलं; जमावाने नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT