Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Tweet: 'राजकारणात कोणताही अपघात...'; संजय राऊतांचं सूचक ट्विट, नेमका रोख कुणाकडे?

Maharashtra Political News: शरद पवारांच्या निवृत्तीच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे.

Vishal Gangurde

Sanjay Raut News: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा होण्याची व्यक्त केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. (Latest Marathi News)

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय आज होणार आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीत शरद पवारांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवारच कायम राहतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच, सर्व राजकीय घडामोडींच्या दरम्यान, संजय राऊत यांनी केलेलं ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊत यांनी 'राजकारणात कोणताही अपघात नसतो ..जर तसे घडले तर समजा ते ठरवून घडवले आहे', अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा रोख नेमका कुणाकडे आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्तीच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सूरू झाली आहे. मात्र, शरद पवारांनी अध्यक्षपदावरच राहावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर शरद पवार देखील पुन्हा अध्यक्षपदावर राहतील, अशीही एक चर्चा आहे.

दरम्यान, शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय या बैठकीत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव समितीने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार आता पुढे काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT